Sunday, June 12, 2011

_: तिची आठवण :_

_: तिची आठवण :_

पाउस म्हटला की मला तिची फार आठवण येते
तिची आठवण मला लगेच भूतकाळात नेते...

पावसातसुद्धा तिच्या सोबत मी किती किती फिरत असे,
माझ्या वाट्याचा चिम्बपणा सगळा तिच्यामध्ये मुरत असे...

ती भेटल्यापासुन असा एकही पाउस झाला नाही,
की ज्या पावसात तिचा हात माझ्या हाती आला नाही...

घरात एकटी ती नेहमी आक्रसूनच बसायची,
पावसात माझ्यासोबत मात्र अगदी खुललेली असायची...

मला ती आवडण्याचं एक खास कारण होतं,
फुला-फुलांचं वस्त्र तिचं, याचंच मला आकर्षण होतं...

भर पावसात चिखल तुडवित मीच एकटा चालत असे,
चिखालाचा स्पर्श तिला नको, म्हणून अलगद उचलून घेत असे...

तीही माझ्या खांद्यावर आपली नाजुक मान ठेवित असे,
माझ्या डोक्यावर पदर धरून मला पावासापासून लापवित असे...

थंड थंड वातावरणात तिला घेऊन उभे राहातांना,
मजा काही औरच होती गरम भुइमुगाच्या शेंगा खतांना...

पण हे सुख माझ्यासाठी फार काळ राहिलं नाही,
आता मात्र दैवाने माझं हीत पाहिलं नाही...

आलेल्या दु:खातून मनाला जरा सुद्धा उसंत नव्हती,
कदाचित आमची मैत्री नियतीलच पसंत नव्हती...

कोणतं दु:ख म्हणून काय विचारताय? माझी व्यथा ऐकायची आहे?
तर ऐका नीट कान देऊन, ही शोकांतिका अशी आहे...

एकदा तिला उचलतांना फुला-फुलांचं वस्त्र फाटलं,
माझं आवडतं वस्त्र फाटलं म्हणून दु:ख मनात दाटल...

दु:ख होऊन नुसतं काय होणार होता रडून,
म्हणून तिच्यावर उरलेलं कापडही मी रागाने टाकलं फाडून...

इतकं सगळं ऐकून तुम्ही योग्यच विचार करताय,
इतक्या खालच्या लेव्हल ला गेलो म्हणून मलाच धारेवर धरताय...

मीही उगाच मघापासून शब्दांच्या शेंगा सोलतोय,
असे काय करता मित्रांनो मी माझ्या छत्रिबद्दल बोलतोय...