मनाला मनाचीच लागून ओढ़,
मनाला मनाने दिली साद गोड...
जगाने सुचविलेत संधी-सामास,
मानानेच केली इथे सार्थ फोड़...
मनाच्या वयाचा ना लागे हिशोब,
कधी पालवी तर कधी जीर्ण खोड...
अश्या या मनाच्या मनाशीच गप्पा,
ज़रा नाटकी वास्तवाशी विजोड...
इथे मांडतो मी स्वगत या मनाचे,
असो कानगोष्टीस तुमचीही जोड़...