Tuesday, November 17, 2009

पहिल्या खुणा

~*~ पहिल्या खुणा ~*~

तू ही मला ओळखत नाहीस,
मी ही तुला ओळखत नाही...

फक्त बघत असतो,
मी असाच जगत असतो...

कुठलच नातं कधी नावाशिवय असत नाही,
पण आपल्या नात्याला काय म्हणायचं मला काही कळत नाही...

तुझं नाव नाहि माहित आणि गाव नाहि माहित,
हल्ली माझ्या मनाचा मला ठाव नाहि माहित...

इतकच मला माहित आहे की तू रोज दिसतेस,
रोज दिवस तोच तो पण तू नविन असतेस...

तू ही कधीतरी असा विचार करून बघ,
सकाळच्या कोवळ्या उन्हात मला स्मरून बघ...

तुलाही कदाचित काहि ओळी सुचतील ...
अन् त्याच आपल्या मैत्रीच्या पहिल्या खुणा असतील ...

अश्रु की पाउस?

~*~ अश्रु की पाउस ~*~

हा थयथय नाचुनि गेलेला वारा का हळवा झाला ?
हळवा होउन अश्रु वाहिले, की नुसता पाउस आला ?

आकाशाला जलधारांचे झुम्बर सुंदर शोभतसे ...
झुम्बरात त्या विद्युत् लहरी कडकड कडकड कोपतसे ...

वनात कोठून, मनात दाटुन, क्षणास गाठुन आला रे,
क्षणात अवघ्या त्याच, मनाचा मयूर नाचुनी गेला रे ...

आकाशाचे अश्रु हे, की जादूचे हे रंग असे ?
सगळी सृष्टि हरित जाहली पाण्याला जरी रंग नसे ...



... आनंद र तळणीकर