Tuesday, November 17, 2009

अश्रु की पाउस?

~*~ अश्रु की पाउस ~*~

हा थयथय नाचुनि गेलेला वारा का हळवा झाला ?
हळवा होउन अश्रु वाहिले, की नुसता पाउस आला ?

आकाशाला जलधारांचे झुम्बर सुंदर शोभतसे ...
झुम्बरात त्या विद्युत् लहरी कडकड कडकड कोपतसे ...

वनात कोठून, मनात दाटुन, क्षणास गाठुन आला रे,
क्षणात अवघ्या त्याच, मनाचा मयूर नाचुनी गेला रे ...

आकाशाचे अश्रु हे, की जादूचे हे रंग असे ?
सगळी सृष्टि हरित जाहली पाण्याला जरी रंग नसे ...



... आनंद र तळणीकर

No comments:

Post a Comment