Monday, May 16, 2011

मैत्रीचा वड

_मैत्रीचा वड_
मी मेघ बनाया गेलो, अन् पाऊस बानूनी पडलो...
फुंकर वार्‍याची आली, मी हसता हसता रडलो...

ती काय असावी स्वप्ने, जी कधीच माझी नव्हती,
परक्यांच्या स्वप्नांसाठी मी उगाच का धडपडलो?

"एकटा कधी मी नसतो, सोबतीस इतके यार"
विसरूनी ख-या जगताला स्वप्नातच मी बडबडलो...

भावना ही माझी होती अन् शब्द तिने दिधलेले,
मग कवन बनून मी माझे बघ तिच्याच ह्र्दयी भिडलो...

का मला न हे उमजावे वागणे कुणाचे नकली,
मी प्रीत बनून का सच्ची सर्वांच्या ह्र्दयी जडलो...

वड मैत्रीचा जो दिसला तो प्रचन्ड मोठा होता,
पारंब्या बनुनी अगणीत मी वडास त्या लडबडलो...

No comments:

Post a Comment