Monday, May 16, 2011

शिंक

_शिंक_

गुदगुल्या होतात जेव्हा तंतुच्या नाकातल्या,
शक्तिने येतात लहरी वायुच्या नरड्यातल्या...

शिंक येता नासिकातिल केस सरसर हालती,
वादळाने ज्याप्रमाणे वृक्ष-वेली डोलती...

तपकीरीची चिमुट जेव्हा बोगद्याला स्पर्शिते,
शिंक येउन छान मग डोकेदुखीला शमविते...

फोडणी कढईतली जेव्हा जळे मिरचीसवे,
घरभरातुन शिंकण्याचे सूर येती नवनवे...

उंबरा ओलांडतांना अपशकूनी जी असे,
तीच अंती बोलण्याच्या सत्य-ग्वाही देतसे...

No comments:

Post a Comment